IMG-LOGO
क्रीडा

AUS Vs AFG T-20 World Cup 2024 : अफगणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी ऐतिहासिक विजय

Sunday, Jun 23
IMG

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या.

सेंट व्हिन्सेंट, दि. २३ : अफगाणिस्तान संघाने सेंट व्हिन्सेंटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. राशिद खानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाचा २१ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजानी ऑस्ट्रेलियावर मारा करत त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानला विजयाची संधी होती. पण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं द्विशतक झळकावलं. त्याच्या झंझावातामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पण त्या पराभवाचा बदला अफगाणिस्ताननं आज घेतला.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम झाद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२. षटकांत १२७ धावांवर गारद झाला.

Share: