नाराजीचं वातावरण मतांमध्ये दिसून आलं. जनतेने भाजप उमेदवाराला घरचा रस्ता दाखवला.
अयोध्या, दि. ४ : उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. अयोध्या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद विजयी झाले आहेत. तर भाजपाचे लल्लू सिंह यांचा मोठा पराभव झाला आहे. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने लोकसभा निवडणूक लढवली. त्याच राम मंदिराच्या अयोध्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. अयोध्यामध्ये जातीय समीकरणाच्या मुद्द्यापेक्षा विकासाच्या आणि जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून अयोध्येमधील लोकांच्या मनात नाराजीचं वातावरण होतं. हेच नाराजीचं वातावरण मतांमध्ये दिसून आलं. जनतेने भाजप उमेदवाराला घरचा रस्ता दाखवला.