IMG-LOGO
लोकसभा २०२४

आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ मोहीम; केजरीवालांचा दावा

Monday, May 20
IMG

भाजपच्या मुख्यालयाबाहेर ‘आप’तर्फे निदर्शने करण्यात आली.

दिल्ली, दि. २० :  आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ मोहीम सुरू केल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. भाजप ‘आप’कडे आव्हान म्हणून पाहत असल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपच्या मुख्यालयाबाहेर ‘आप’तर्फे निदर्शने करण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना संबोधित केले.‘आप’च्या मोर्चाच्या घोषणेनंतर दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ‘आप’ने निदर्शनांसाठी कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, मोर्चाची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. भाजपने ‘आप’च्या प्रस्तावित मोर्चावरून केजरीवाल राजकीय नाटक करत असल्याची टीका केली. येत्या काळात आपली बँक खाती गोठवली जातील आणि आपले कार्यालय देखील काढून घेतले जाईल त्यामुळे आपण रस्त्यावर येऊ’’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. मालिवाल प्रकरणात भाजपने कट रचल्याचा निष्कर्ष ‘आप’ने कसा काय काढला असा प्रश्न दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेव यांनी विचारला. केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमार यांना दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडी महान्यायदंडाधिकारी गौरव गोयल यांच्यासमोर दिल्ली पोलिसांच्या अर्जावर शनिवारी मध्यरात्री सुनावणी झाली.

Share: