भाजपच्या या रणनितीचा परिणाम भविष्यातल्या जागांवरही होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई, दि. २० : भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण ९९ जणांना संधी देण्यात आली आहे. पण यापैकी पाच मतदारसंघ हे भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसनेकडून खेचून घेतले आहेत. धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण हे मतदारसंघ शिवसेनेचे होते. पण आता या मतदारसंघात भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.