IMG-LOGO
विदेश

Bangladesh violence २० पेक्षा अधिक अवामी लीग नेत्यांची केली हत्या

Wednesday, Aug 07
IMG

संलग्न संघटनांच्या किमान २० नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडले.

कोमिल्ला, दि. ७ :  कोमिल्ला येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात ११ जण ठार झाले. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी आग लावल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी घरातून त्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये पाच तरुणांचाही समावेश आहे. बांगलादेशात हिंसाचार सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. या सोबतच अवामी लीगच्या नेत्यांना देखील लक्ष्य केलं जात आहे. मंगळवारी तब्बल अवामी लीगच्या तब्बल २० नेत्यांची हत्या करण्यात आली. देशभरात अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान २० नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडले.  सोमवारी संतप्त जमावाने या भागातील शाह आलमच्या घरावर हल्ला केला. काही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढले. दरम्यान, जमावाने घराच्या तळमजल्यावर आग लावली. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर आसरा घेत असलेले लोक धुरामुळे व आगीमुळे होरपळून मरण पावले. या घटनेत किमान १० जण जखमी झाले आहेत. यातील एका गंभीर जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 

Share: