IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

पैसे वाटपावरून काँग्रेस, भाजपचे आरोप प्रत्यारोप; पुण्यात रवींद्र धंगेकर यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

Monday, May 13
IMG

पोलिस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्यातच धंगेकरांनी रविवारी ठिया मांडला.

पुणे, दि. १३ :  सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केला आहे. पोलिस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्यातच धंगेकरांनी रविवारी ठिया मांडला. त्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू झालं होते. जोपर्यंत पोलिस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून उठणार नाही, असं म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आता पुण्याच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता शनिवारी झाली. रविवारी रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात असताना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिवदर्शन, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

Share: