IMG-LOGO
महाराष्ट्र

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान

Wednesday, Jun 26
IMG

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ३०,१५६ इतकी आहे.

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचे  मतदान आज होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान झाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ७९,६४१ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  ३५.६५ इतकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ४६,३७५ इतकी आहे. दुपारी  १  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ३८.३९ इतकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ६,४११  इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  ४०.४८ इतकी आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ३०,१५६ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४३.४७ इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Share: