अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.
दिल्ली, दि. २ : अरुणाचल प्रदेशात भाजपा विक्रमी जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या तयारीत दिसत आहे. तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं निकालावरुन समजत आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या एकूण ६० जागांवर निवडणूक जाहीर झाली होती. ज्यामधील १० जागांवर भाजपाने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर निकालातील पुढच्या आकड्यांनुसार भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेस पूरती धोबीपछाड झाल्याचे निकालातून समजते.सिक्कीमचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एसडीएफचे प्रमुख पवन कुमार चामलिंग यांचा पोकलोक कामरंग आणि नामचेबुंग विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आठ वेळा आमदार राहिलेले चामलिंग हे त्यांच्या मूळ नामची जिल्ह्यातील पोकलोक कामरंग जागेवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या भोज राज राय यांच्याकडून तीन हजार ६३ मतांनी पराभूत झाले. राय यांना ८ हजार ३७ मेत मिळाली तर, चामलिंग यांना ४ हजार ९७४ मते मिळाली. चामलिंग हे १९९४ ते २०१९ पर्यंत २५ वर्षे सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्ली राम थापा यांना अप्पर बुर्टुक विधानसभा मतदारसंघातून SKM उमेदवार कला राय यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. थापा हे राय यांच्याकडून २ हजार ९६८ मतांनी पराभूत झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.