IMG-LOGO
लोकसभा २०२४

पूर्वीपेक्षा भाजप आता अधिक सक्षम RSS ची गरज नाही ; जे. पी. नड्डांचं मोठं विधान

Sunday, May 19
IMG

जे. पी. नड्डा यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिल्ली, दि. १९ : अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता.  सुरुवातीला आमची ताकद कमी होती. मात्र, आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो. पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत असं नड्डा यांनी म्हटलं आहे. जे. पी. नड्डा यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचाही तर्क लावला जात आहे. देशभरात लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच नड्डा यांनी हे विधान केलंय. नड्डा यांच्या या वक्तव्यानंतर आता संघाची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता.  सुरुवातीला आमची ताकद कमी होती. मात्र, आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो.  पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत असं नड्डा यांनी म्हटलं.

Share: