सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने देशांतर्गत किंमती कमी होऊ शकतात.
नवी दिल्ली, दि. २३ : गगनाला भिडलेल्या सोन्याचा दर आता नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची घोषणा केली. तसंच, प्लॅटिनमवरील सीमाशुल्कही ६.४ टक्क्यांनी कमी होणार आहे. परिणामी सोन्या-चांदीचे भाव आता कमी होण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने देशांतर्गत किंमती कमी होऊ शकतात. त्यामुळे मागणी वाढणार आहे. सोन्या चांदीवर सध्या १५ टक्के सीमाशुल्क आहे. यामध्ये १० टक्के मुलभूत कस्टम ड्युटी, ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे.