IMG-LOGO
महाराष्ट्र

बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक

Friday, Aug 23
IMG

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, दि.२३ :  बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बंदची हाक दिली आहे. हा बंद राजकीय स्वरुपाचा नाही असेही ठाकरेंचे म्हणणे आहे. या बंदला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बदलापुरातील प्रकरणानंतर लोकांमध्ये रोष असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शिवसेना उबाठाला अपेक्षा आहे. महायुतीच्या नेत्यांनी 20ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावर टीका करताना विरोधक या गंभीर मुद्दावरूनही राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. बदलापुरातील आंदोलन पेटवण्यामागेही विरोधकांचा हात असावा असे आरोप महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. 

Share: