IMG-LOGO
लोकसभा २०२४

loksabha Election 2024 : सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी थंडावला; उद्या मतदान, ओडिशामध्ये विधानसभेसाठीही मतदान

Friday, May 24
IMG

ओडिशामध्ये शनिवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

दिल्ली, दि. २४ : लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी थंडावला आहे. सहा राज्ये तसेच दोन केंद्रशासित प्रदेशांतील ५८ जागांवर उद्या, शनिवारी मतदान होत आहे. दिल्लीतील सर्व सात जागा, हरियाणातील सर्व १० जागा आणि उत्तर प्रदेशातील १४ जागांचा यामध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातही मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार रिंगणात आहेत.ओडिशामध्ये शनिवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ४२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

Share: