एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे तीन आणि दुसऱ्या वर्षातील एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली.
दिल्ली, दि. १९ : ‘नीट-यूजी’ पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुरुवारी पाटणाच्या ‘एम्स’मधील चार विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, अशा संशयित विद्यार्थ्यांना सीबीआय आपल्या ताब्यात घेत आहे. चौकशीनंतर या चार विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली आहे. या विद्यार्थ्यांकडून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता सीबीआयला आहे.एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे तीन आणि दुसऱ्या वर्षातील एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. या चार विद्यार्थ्यांना वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्यांमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तशी माहिती देण्यात त्यांना देण्यात आली आहे. तसेच सीबीआयने त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्याही सील केल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.सीबीआयने ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंदन सिंग, राहुल अनंत आणि कुमार शानू हे तृतीय वर्षाचे आहेत आणि करण जैन हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, असे एम्स पाटणाचे संचालक जी के पॉल यांनी सांगितले.