पेपर लीक प्रकरणातील मुख्य सुत्रधार शशीकुमार पासवानचादेखील समावेश आहे. तर इतर दोन जण एमबीबीएसचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आलं आहे.
भरतपूर, दि. २० : नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये पेपर लीक प्रकरणातील मुख्य सुत्रधार शशीकुमार पासवानचादेखील समावेश आहे. तर इतर दोन जण एमबीबीएसचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आलं आहे. राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कुमार मंगलम बिश्नोई आणि दिपेंद्र कुमार, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी कुमार मंगलम बिश्नोई हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, तर दिपेंद्र कुमार प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. हे तिन्ही जण पेपर सोडवण्यासाठी ५ मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.