IMG-LOGO
महाराष्ट्र

मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द

Thursday, May 30
IMG

ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लाॅक असेल.

मुंबई, दि. ३० : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लाॅकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येईल. तर,ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लाॅक असेल. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लाॅक सुरू असेल. शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लाॅक असेल. या कालावधीत मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर, ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. तसेच ७४ रेल्वेगाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत:रद्द होणार आहेत. परिणामी, मध्य रेल्वेवरील सुमारे ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहे.मध्यरात्री 30/31 (गुरुवारी-शुक्रवारी) ते 2 जून च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्मच रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी जाणार वाढवली आहे. 63 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहा च्या रुंदीकरणाचं काम करण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 36 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान फलाट क्रमांक 10 आणि 11 वर २४ डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. - ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर 63 तासांचा विशेष ब्लॉक असेल ३०/३१ च्या मध्यरात्री १२.३० पासून ते २ जुन दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील 36 तासांचा ब्लॉक ३१/१ च्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार असून २ जुने दुपारी १२.३० पर्यंत असेल- 930 लोकल सेवा रद्द  तर ४४४ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट - शुक्रवारी १६१ गाड्या - शनिवारी ५३४ गाड्या - रविवारी २३५ गाड्या रद्द 

Share: