लोकसभेला जी काय खटपट झाली, ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये.
मुंबई, दि. २७ : राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत.अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे. विधानसभेमध्ये 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असे सांगितलं होते. आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. लोकसभेला जी काय खटपट झाली, ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, हे आधीच आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०-६० निवडून येणार हो. ५० च घ्यायच्या. मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही आणखी खाली येणार. तसं होताच कामा नये, त्यामुळे आताच त्यांना सांगून टाकावं, आमचा वाटा आम्हाला मिळायला हवा, असं छगन भुजबळ म्हणाले.भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय. नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं.