स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे.
कोल्हापूर, दि. ३० : सिंधुदुर्ग येथील मालवण येथे राजकोटावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हा पुतळा उभरणारा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सलटंट असलेला चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे.