IMG-LOGO
महाराष्ट्र

अभिनेत्रेरी रेणुका शहाणेंच्या टायमिंगवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शंका

Thursday, May 09
IMG

वाघ यांनी शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारत त्यांनी हा मुद्दा आता उचलून धरण्याच्या टायमिंगवर शंका व्यक्त केली आहे.

मुंबई, दि. ९ : नोकरीच्या जाहिरातीत ‘मराठी नॉट वेलकम’ असं म्हणणाऱ्या गिरगावातील कंपनीविरोधात, तसेच मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखणाऱ्या घाटकोपरमधील एका सोसायटीविरोधात वातावरण तापलेलं असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसाठी आवाज उठवला होता. रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वाघ यांनी शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारत त्यांनी हा मुद्दा आता उचलून धरण्याच्या टायमिंगवर शंका व्यक्त केली आहे. यामागे राजकीय हेतू तर नाही ना?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहलेले हे जाहीर पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रा वाघ यांनी पत्रात काय म्हटले ? वाचा सविस्तर जय महाराष्ट्र  आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा,परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे. भारतीय  विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की, आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वत: खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. आपणास एक प्रश्न विचारते की  कोविडमधे पिपिई किट्स,बॉडी बॅग्स,मास्क,औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का? असा सवालही पत्रात केला आहे. 

Share: