IMG-LOGO
महाराष्ट्र

सरकारला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत : नाना पटोले

Tuesday, Aug 20
IMG

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली

बदलापूर, दि. २० : बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन केलं. जवळपास गेल्या ९ तासापांसून हे आंदोलन सुरु होतं. त्यावरून नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली आहे. “बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. ही घटना आज नाही तर १३ ऑगस्ट रोजी घडली. आता १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या इमारतीच्या नुतनीकरणाचं उद्धघाटन केलं. त्यावेळी या घटनेची कुजबुज असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मग मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव होता? मग मुख्यमंत्री फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करत आहेत का?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला. “बदलापूरची जनताच नाही तर महाराष्ट्रातील जनताही रस्त्यावर यायला लागली आहे. राज्यातील अनेक मुली गायब झाल्या, याबाबत आम्ही विधानसभेतही अनेकदा सरकारला प्रश्न विचारले. मात्र, सरकार यावर काहीही उत्तर देत नाही. आता बदलापूरची घटना समोर आलेली आहे. या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आपण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. या सरकारला आपण वठणीवर आणू. तसेच महाराष्ट्रात अशा प्रकारे अत्याचाराची घटना घडणार नाही, याची अद्दल या सरकारला घडवल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

Share: