रामगिरी महाराजांविरोधात येवल्यात गुन्हा दाखल झाला.
नाशिक, दि. १६ : रामगिरी महाराजांनी नाशिकच्या सिन्नरमधील पंचाळे गावात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सिन्नर तालुक्यात सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याच सप्ताहात रामगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविरोधात टीपणी केली. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावल्या दुखावल्या गेल्या आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावाने रस्त्यावर उतकत याविरोधात आंदोलन सुरू केलं.रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर वैजापूर, संभाजीनगर व नगर येथे मुस्लिम समाजाने मोर्चे काढत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. रामगिरी महाराजांविरोधात येवल्यात गुन्हा दाखल झाला.