IMG-LOGO
शिक्षण

डीएलएड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास २५ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, Jun 23
IMG

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई, दि. २३ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता डीएलएड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी कळविले आहे.या बाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share: