IMG-LOGO
राष्ट्रीय

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, पाकिस्तानात केंद्रबिंदू

Wednesday, Sep 11
IMG

भूकंपाची वेळ दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांची नोंदवण्यात आली आहे.

दिल्ली, दि. ११ : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागात भूकंपाच्या धक्क्याने धरती हादरली. पाकिस्तानचे वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, खैबर पख्तूनख्वापासून पंजाबपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू डेरा गाझी खानजवळ असल्याचे मानले जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली खोल असल्याने याची तीव्रता कमी असल्याचे दिसून आले.भूकंपाची वेळ दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांची नोंदवण्यात आली आहे. सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, भूकंपाची तीव्रता ६ पेक्षा कमी असेल तर फारसा धोका नसतो. पण या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली फारसे खोल नसल्याने ते धोकादायक ठरू शकले असते. मात्र अद्याप कोणतीही जीवित हानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.  

Share: