IMG-LOGO
नाशिक शहर

प्रचंड गुंतागुंत असूनही चीन 'सप्लाय चेन'मध्ये नंबर वन : डॉ. कुलकर्णी

Thursday, May 23
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यानात ते 'चीनच्या सप्लाय चेनची सद्य:स्थिती- चीनच्या उंबरठ्यावरून' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २३ : पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्र प्रचंड गुंतागुंतीचे आहे. त्यासाठी नेहमीच अपडेट राहावे लागते. तरीही या क्षेत्रात चीन जगात एक नंबरवर आहे. असे प्रतिपादन हॉंगकॉंग येथील पुरवठा साखळी व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मनोज कुलकर्णी यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यानात ते 'चीनच्या सप्लाय चेनची सद्य:स्थिती- चीनच्या उंबरठ्यावरून' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. कांताबेन रसिकलाल शाह यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. मायको बॉश कंपनीचे वरिष्ठ  महाव्यवस्थापक मुकुंदराव भट, सह्याद्री फार्म्सचे सप्लाय चेन  व्यवस्थापक तुषार नांदगावकर, निवृत्त आयपीएस अधिकारी हरीश बैजल  व्यासपीठावर उपस्थित होते. कांतीलाल तातेड यांनी स्वागत केले. यावेळी पांडुरंग चव्हाण यांनी  व्याखनमालेला देणगी प्रदान केली. मालेचे सचिव हेमंत देवरे यांनी हा धनादेश स्वीकारला. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. कुलकर्णी  म्हणाले की, मुंबईकर असून शांघाय येथे राहत असलो तरी कर्मभूमी म्हणुन नाशिकशी संबंध आल्याचा नेहमीच अभिमान वाटतो. हॉंगकॉंग हा चीनचा उंबरठा आहे. तेथे राहून भारत आणि चीन या दोन देशांच्या संस्कृती जवळून अनुभवता आले. हे व्यापाराचे आणि आर्थिक केंद्र आहे. असे सांगत त्यांनी हॉंगकॉंगची माहिती दिली. हॉंगकॉंग आणि चीनचा निकटचा संबंधही त्यांनी स्पष्ट केला. तसेच चीनला कम्युनिस्ट मानले जात असले तरी तो समाजवादी देश असल्याचे सांगत त्यांनी तेथील संस्कृती आणि परंपरा याबाबतही माहिती दिली. भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी हे सारे मिळतेजुळते असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच चीनची प्रसिध्द भिंत आणि तियानमेन स्क्वेअर आदींची माहिती देत तेथील मान्यता, लिपी, कला आणि हस्तकला, खाद्यसंस्कृती, सार्वजनिक स्वच्छता, समुद्रकाठ, सायकल, विमानतळ, उड्डाणपुल, तेथील हवामान, लोकसंख्या, नैसर्गिक खनिज, उत्पादनं, तेथील विकासदर, विविध क्षेत्र आदींचा थोडक्यात पण समर्पक असा आढावा घेतला. चीनच्या राजकीय व्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती दिली. चीनची लिपी शिकणे अत्यंत अवघड असल्याचेही ते म्हणाले. पुरवठा साखळी हा क्लिष्ट असा विषय आहे, हे समजाऊन सांगताना त्यांनी द्राक्ष निर्यातीचे उदाहरण दिले. यामधील नेटवर्क म्हणजेच पुरवठा साखळी होय. प्रत्येक वस्तुची अशी साखळी वेगवेगळी असते. त्यानुसार केलेले काम म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन होय. यासाठी व्यवस्थापकाला प्रचंड माहिती असणे अत्यंत महत्वाची असते. या क्षेत्रातील अनिश्चितता, गुंतागुंतही महत्वाची ठरते. त्यासाठी नेहमीच अपडेट राहावे लागते. कोविड काळात तर या क्षेत्राला खुपच अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अनुषंगाने त्यांनी चीनमधील अर्थ व्यवस्था, जीडीपी, सामाजिक स्थिती आदींचीही माहिती दिली.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटेकर ब्रदर्स प्रस्तुत मेलडी मास्टर्स ऑफ बॉलिवूड हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये जयंत पाटेकर, उषा पाटेकर, किशोर पाटेकर व चंचल चौधरी यांनी विविध गिते सादर केली. तर प्रवीण पोतदार यांनी निवेदन केले.

Share: