IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

Maharashtra Vidhansabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं रणशिंग

Tuesday, Oct 15
IMG

शंखनाद! देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात व्हिडिओ पोस्ट केली आहे.

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात ा२० नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसयांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.शंखनाद! देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात व्हिडिओ पोस्ट केली आहे. लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल, आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू. भाजपच्या नेतृत्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले, बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या.  या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय... असे दुसऱ्या पोस्टमध्ये नमूद करताना त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे. 

Share: