या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कलबुर्गी, दि. ११ : विक्रीनंतरच्या सर्व्हिसच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिकला सातत्यानं अडचणी येत आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या खराब सर्व्हिसिंगला कंटाळून याआधी अनेक ग्राहकांनी ओला इलेक्ट्रिकच्या वाहनांंना लक्ष्य केलं आहे. कधी तोडफोड तर कधी निदर्शनं झाली आहेत. मात्र, कर्नाटकमधील एका घटनेनं यापुढचं टोक गाठलं आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बिघाडानंतर योग्य सेवा मिळत नसल्यामुळं कर्नाटकातील कलबुर्गी इथं एका व्यक्तीनं ओलाच्या शोरूमला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद नदीम असं या व्यक्तीचं नाव आहे. नदीमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.