शनिवार, १७ ऑगस्टपासून २४ तासांसाठी हा बंद असणार आहे.
मुंबई, दि. १६ : कोलकात्यात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आयएमएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवार, १७ ऑगस्टपासून २४ तासांसाठी हा बंद असणार आहे.देशातील सर्व आधुनिक वैद्यक डॉक्टरांनी कोणतेही क्षेत्र आणि कामाचे ठिकाण विचारात न घेता २४ तास सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील सेवा आणि शस्त्रक्रिया सुरू राहतील. सर्व खासगी रुग्णालयातील ओपीडी बंद राहणार आहेत. तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संप सुरू राहील.