डोंबिवली परिसरातील एमआयडी फेज 2 मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत.
डोंबिवली, दि. २४ : डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. अतिशय भीषण स्वरुपातील या स्फोटामुळं एमआयडीसी भागातील बहुतांश कंपन्यांचं नुकसान झालं, तर स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या काचाही फुटल्या. आतापर्यंत या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेमध्ये काही कामगार आणि नागिरकांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. स्फोटाची कारणे स्पष्ट नाही प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील एमआयडी फेज 2 मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत. अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. अमुदान केमिकल कंपनी, मेहता पेंट,के.जी.एन, केमिकल,सप्त वर्ण ,हुंडाई शो रूम आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Dombivali Midc Blast Latest News) या स्फोटाची तीव्रता किती आहे, हा स्फोट नेमका कुठे झाला, त्याची कारण काय आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.जखमींच्या उपचाराची व्यवस्था : फडणवीस "डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.