IMG-LOGO
विदेश

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार

Sunday, Jul 14
IMG

सिक्रेट सर्व्हिस एजंटने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला ठार केलं आहे.

बटलर कांऊटी, दि. १४ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती देखील जो बायडन यांनी दिली. सिक्रेट सर्व्हिस एजंटने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला ठार केलं आहे. ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. ही गोळी दोन सेमीने चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता. डोनाल्ड ट्रम्प हे भाषणासाठी उभे होते. त्यावेळी अचानक त्यांच्या कानाजवळून काहीतरी गेलं. त्यानंतर ते तातडीने खाली वाकले. सुरक्षारक्षकांनी व्यासपीठावर धाव घेतली. गर्दी जमलेली होतीच तिथेच आरडाओरडा सुरु झाला. सिक्रेट सर्व्हिस कमांडोंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कडं तयार केलं. ट्रम्प त्यानंतर उठून उभे राहिले आणि मूठ आवळत आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं. ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅली घेण्यात आलेलं मैदान रिकामं केलं. सीक्रेट सर्व्हिसकडून हा गोळीबार म्हणजे खुनाचा प्रयत्न असल्याचा तपास केला जातोय.

Share: