लोणी देवकर मध्ये डॉ. डोंगरे यांच्या ओंकार हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न मौजे लोणी देवकर येथील डॉ. डोंगरे यांनी नूतनीकरण केलेल्या ओंकार हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन शुभारंभ मा.नामदार दत्तामामा भरणे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक व औकाफ मंत्री महाराष्ट्र राज्य व आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. बाळासाहेब आजबे काका यांच्या शुभहस्ते दिनांक 01-2- 2025 रोजी सकाळी 11 वाजता. संपन्न झाला याप्रसंगी माजी आमदार यशवंत तात्या माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा. आपासाहेब जगदाळे, प्रवीण भैय्या माने मा.आरोग्य व बांधकाम सभापती जि. प. पुणे,अकलूजचे प्रख्यात हृदयरोग तज्ञ मा. एम के इनामदार सर, डॉ.अविनाश पाणबुडे, डॉ. मिलिंद खाडे,डॉ.शीतल शहा, डॉ. धैर्यशील हिंगमिरे,डॉ.अभिजीत ठोंबरे, डॉ.राजपुरे, डॉ.बोंगाणे, डॉ. श्री व सौ.गांधी, नाशिक सकाळचे माजी संपादक व सध्याचे लोकशाही आघाडीचे संपादक योगाचार्य प्रा. डॉ. विश्वास देवकर , शिवसेना सहकार सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरज भैय्या काळे ,श्रीगोंदा सहकारी कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील, जलसंपदा विभाग स्थापत्य अभियंता श्री. तोलाराम जगताप,बहुजन परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष बिभिषण लोखंडे, लोणी देवकर गावचे ग्रामपंचायत उपसरपंच भारत गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते
लोणी देवकर मध्ये डॉ. डोंगरे यांच्या ओंकार हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न मौजे लोणी देवकर येथील डॉ. डोंगरे यांनी नूतनीकरण केलेल्या ओंकार हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन शुभारंभ मा.नामदार दत्तामामा भरणे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक व औकाफ मंत्री महाराष्ट्र राज्य व आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. बाळासाहेब आजबे काका यांच्या शुभहस्ते दिनांक 01-2- 2025 रोजी सकाळी 11 वाजता. संपन्न झाला याप्रसंगी माजी आमदार यशवंत तात्या माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा. आपासाहेब जगदाळे, प्रवीण भैय्या माने मा.आरोग्य व बांधकाम सभापती जि. प. पुणे,अकलूजचे प्रख्यात हृदयरोग तज्ञ मा. एम के इनामदार सर, डॉ.अविनाश पाणबुडे, डॉ. मिलिंद खाडे,डॉ.शीतल शहा, डॉ. धैर्यशील हिंगमिरे,डॉ.अभिजीत ठोंबरे, डॉ.राजपुरे, डॉ.बोंगाणे, डॉ. श्री व सौ.गांधी, नाशिक सकाळचे माजी संपादक व सध्याचे लोकशाही आघाडीचे संपादक योगाचार्य प्रा. डॉ. विश्वास देवकर , शिवसेना सहकार सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरज भैय्या काळे ,श्रीगोंदा सहकारी कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील, जलसंपदा विभाग स्थापत्य अभियंता श्री. तोलाराम जगताप,बहुजन परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष बिभिषण लोखंडे, लोणी देवकर गावचे ग्रामपंचायत उपसरपंच भारत गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा डॉ. डोंगरे आणि परिवाराच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री महोदय दत्तामामा भरणे यांनी आपल्या मनोगतांमध्ये डॉ. डोंगरे यांच्या ओंकार हॉस्पिटल ला मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या आपण अशीच रुग्णसेवा अव्यातपणे चालू ठेवावी असे सांगितले. डॉ. डोंगरे हे अतिशय कमी फी मध्ये वैद्यकीय सेवा देतात. असे मला अनेकांनी सांगितलेले आहे त्यांनी असेच सर्व गोरगरीब व गरजू रुग्णांना मदत करावी त्यांना कुठेही कुठलीही अडचण आली तरी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे तसेच पेशंटला पुढील उपचारासाठी काही शासकीय मदत लागली व इतर आर्थिक मदत लागली तरी हा मामा खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे याची हमी देतो तसेच पुढे बोलताना मामा म्हणाले अगदी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून व पुढे दोन वेळा आमदारकीच्या काळामध्येही या लोणी गावाला भरभरून विकास कामे दिली कधी हात आकडता घेतला नाही पण गावाकडून मला त्या प्रमाणात पाहिजे तसे सहकार्य मदत मिळालेली नाही याबद्दल खंत व्यक्त केली असे असूनही यापुढे तरीही हा मामा तुमच्या गावाला मदत करणारच आहे तो माझा स्वभाव आहे तरी यापुढे या लोणी गावासाठी कसलाही निधी कमी पडू देणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली तसेच तुमच्याकडूनही मला तशाच सहकार्याची अपेक्षा आहे असे सांगितले, त्यानंतर पुढे डॉ. पाणबुडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये डॉक्टर व पेशंट यांचे नाते तसेच डॉक्टरनी पेशंटला कशी सेवा द्यावी, व पेशंट सुद्धा डॉक्टरांशी कसे आदबीने वागले पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व डॉ.सुहास डोंगरे व डॉ.सौ.सरिता डोंगरे यांच्या नूतन कार्यास शुभेच्छा दिल्या यानंतर मा. बाळासाहेब आजबे काका यांनी त्यांचे विचार मांडताना डॉ. सुहास डोंगरे हे माझे साडू आहेत व ते दोघे पती-पत्नी डॉक्टर असल्याने रुग्णांना अव्यातपणे 24 तास सेवा देऊ शकतात याची मी हमी देतो गेले 25 वर्षापासून म्हणजे आमचे नातेसंबंध जोडले गेल्यापासून मी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय जवळून पाहिला या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास व पेशंटशी असलेले त्यांचे हितसंबंध पाहून आम्हा सर्व नातेवाईकांना त्यांचा नेहमीच गौरव वाटत आलेला आहे डॉ. सुहास डोंगरे व डॉ.सरिता डोंगरे यांच्या पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो .योगाचार्य विश्वास देवकर यांनी सुद्धा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना डॉ. सुहास डोंगरे यांना अनेक अडचणी आल्या त्या मी जवळून पाहिल्या आहे,शालेय जीवनात आम्ही दोघेही पुण्यात कमवा व शिका योजनेत काम करून शिक्षण पूर्ण केले म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीपासून सुहासने संघर्ष केला आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉ.सरिता डोंगरे यांची त्यांना बहुमोलाची साथ लाभली. डॉ. एम के इनामदार यांनी सांगितले की डॉ.सुहासने ज्यावेळी छोटी ओपीडी सुरू केली, त्यावेळी मी उद्घाटनासाठी आलो होतो नंतर त्यांनी हे क्लिनिक बांधले त्यावेळी मी उद्घाटनाला आलो व आता त्याच क्लिनिकचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले नूतनीकरण केले भव्य अशी वास्तू उभा केली त्याचे पण उद्घाटन करण्यासाठी मी ही तिसऱ्यांदा येत आहे माझी त्याच्यासाठी ही हॅट्रिक झालेली आहे. यावरून माझे व डोंगरे कुटुंबीयांचे स्नेहबंध आपल्या लक्षात आले असतील डॉ.सुहास हा माझा शिष्य आहे व डॉ. सरिता ही त्यास योग्य अशी साथ देत आहे त्यांच्या हातून रुग्णसेवा घडावी व त्यांची ही उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा मी व्यक्त करत आहे समारोपप्रसंगी डॉ. डोंगरे यांनी आदरणीय दत्ता मामा भरणे यांनी अगदी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून ते पुढे मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकांचा मानसन्मान केला तालुक्यातील रुग्णासाठी वैद्यकीय मदत कक्षामार्फत अनेक रुग्णांना आर्थिक मदत भरघोसपणे मिळवून देण्यास सहकार्य केले त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत व आजच्या कार्यक्रमास वेळात वेळ काढून उपस्थित झाल्याबद्दल दत्तामामा भरणे यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे व डॉक्टर व नातेवाईक लोणी देवकर गावचे उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांचे डॉ.सुहास डोंगरे यांनी आभार मानले