IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची भाजपला सोडचिठ्ठी; हाती घेणार तुतारी

Friday, Oct 18
IMG

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे.

मुंबई, दि. १८ :  राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये  असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी आपण भाजप सोडत असल्याचे म्हटले. मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, अशी घोषणाच लक्ष्मण ढोबळेंनी केली

Share: