IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

मालेगावात माजी महापौरांवर मध्यरात्री झाडल्या ३ गोळ्या; प्रकृती चिंताजनक

Monday, May 27
IMG

मालिक हे रात्री एक वाजेच्या सुमारास येथील जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात एका दुकानासमोर आपल्या मित्रांसह बसले होते.

मालेगाव, दि. २७ : मध्यरात्रीच्या सुमारास मालेगावचे माजी महापौर तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’चे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञात व्यक्तींना अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटरसायकलवरुन आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडल्या. अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.मालिक हे रात्री एक वाजेच्या सुमारास येथील जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात एका दुकानासमोर आपल्या मित्रांसह बसले होते. यावेळी अचानक आलेल्या दोघा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी छातीत घुसली असून दुसरी गोळी पायाला लागली. आणखी एक गोळी हाताला स्पर्श करुन गेली आहे.

Share: