IMG-LOGO
महाराष्ट्र

प्रेयसीची लॉजवर केली हत्या; प्रियकरानेही गळफास घेत संपवलं जीवन

Saturday, Oct 12
IMG

प्रियकराने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले

पुणे, दि. १२  : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लॉजवर बोलवून तिची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या खराळवाडी परिसरातील हॉटेल राज प्लाझामध्ये ही घटना घडली. प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर प्रियकराने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नितेश नरेश मिनेकर आणि करिश्मा इश्वर घुमाने असं या मृत प्रेमी युगुलाचं नाव आहे. प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हॉटेलच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतमधून नितेशचा प्रतिसाद येत होता. तो म्हणत होता की, थोडा वेळ थांबा माझ्या अंगावर कपडे नाहीत, कपडे घालतो व दरवाजा उघडतो. बराच वेळ झाला तरी नितेश दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. करिश्मा रक्ताच्या थोराळ्यात पडली होती तर नितेशने गळफास लावून आपले जीवन संपवले होते. 

Share: