IMG-LOGO
क्रीडा

हार्दिक पंड्याकडून घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब

Friday, Jul 19
IMG

प्रायव्हसीचा आपण आदर ठेवावा अशी विनंती.आपल्याकडून या वेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.

मुंबई, दि. १९  : हार्दिक व नताशाने ३१ मे २०२० ला लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र त्यांनतर वर्षभरातच पांड्या कुटुंबात सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहीत घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. हार्दिक व नताशाने चार वर्षांनी आपले नाते संपवले आहे.हार्दिकने पोस्टमध्ये लिहिले की, “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू. या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या प्रायव्हसीचा आपण आदर ठेवावा अशी विनंती.आपल्याकडून या वेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.- हार्दिक व नताशा”

Share: