राज्यात शेतकरी, जवान आणि पैलवानांच्या नाराजीचे कथानक काँग्रेसकडून चालवले जात होते.
चंडीगड, दि. ८ : हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे अनपेक्षित लागले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार काँग्रेस आघाडी घेताना दिसत होती. मात्र नंतर चित्र पुर्ण पालटलं आणि भाजपनं जोरदार मुसंडी मारली. ताज्या आकडेवाडीनुसार भाजप ४९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३५ जागांवर अडकली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा संपूर्ण निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत होते आणि राहुल गांधी यांनी डझनभर सभा, विजय संकल्प यात्रा काढल्या होत्या. याशिवाय राज्यात शेतकरी, जवान आणि पैलवानांच्या नाराजीचे कथानक काँग्रेसकडून चालवले जात होते. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता.