या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
मुंबई, दि. १८ : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे १ हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक ५ किलोमीटरवर एक ‘आपला दवाखाना’ तयार करण्यात आला होता. वारी दरम्यान ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून २,३२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाई कामगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाबचा त्रास झाल्यास सेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. फिरत्या रुग्णवाहिकेबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देत होत्या. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. रुग्णवाहिकेबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात आलेली सेवाप्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’- २५८वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४ बाय ७ उपलब्ध – ७०७दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५८८५महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना –१३६पालखी मार्गावर आरोग्य दूत –२१२पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.