IMG-LOGO
राष्ट्रीय

आजारी पत्नीची मृत्यूशी झुंज अपयशी; गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी स्वत:वर झाडली गोळी

Tuesday, Jun 18
IMG

त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याच्या काही मिनिटात चेतिया यांनी स्वत:वर गोळी झाडली.

गुवाहाटी, दि. १८ :  आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आपल्या पत्नीच्या निधनानंतर स्वत:चा जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होती. दोन महिन्यांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आयसीयूमध्ये आपल्या सरकारी पिस्तुलाने पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:वर गोळी झाडली. आसाम पोलीस महानिर्देशक जीपी सिंह यांनी चेतिया यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याच्या काही मिनिटात चेतिया यांनी स्वत:वर गोळी झाडली. चेतिया यांच्या निधनानंतर आसाम पोलिसांना जबर धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी प्रदीर्घ आजारामुळे पत्नीच्या निधनानंतर मंगळवारी गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतिया यांनी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली. जिथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडली, त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला. चेतिया यांच्या पत्नीला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्या या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

Share: