IMG-LOGO
लोकसभा २०२४

NEET पेपर लीक प्रकरणावरून लोकसभेतं विरोधकांचा गोंधळ, लोकसभा तहकूब

Friday, Jun 28
IMG

शुक्रवारी (२८ जून) सकाळी ११ वाजता संसदेच्या पाचव्या दिवसाचं कामकाज सुरू झालं.

मुंबई, दि. २८ : राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही वेळाने विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेची मागणी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये गोंधळ सुरू झाला. परिणामी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं.शुक्रवारी (२८ जून) सकाळी ११ वाजता संसदेच्या पाचव्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार चर्चा सुरू करण्यात आली. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळाने विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेची मागणी केली. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, NEET पेपर लीक प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. सरकारने जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत आणि यावरील उपाययोजना सांगायला हव्यात. सभागृहातील चर्चेतून देशभरातील विद्यार्थ्यांना संयुक्त संदेश जायला हवा की विरोधक आणि सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की सभागृहात NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चा व्हावी. राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, प्रत्येक मुद्द्यावर सर्वांना बोलण्याची संधी मिळेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तवावर सर्वजण चर्चा करू शकतात. त्याचबरोबर मी सरकारला सांगेन की त्यांनी तुमच्या मुद्द्यावर उत्त द्यावं.

Share: