रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचा समावेश करू शकतो.
बार्बाडोस, दि. २० : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर 8 मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. बार्बाडोस येथील मैदानावर हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी खेळवला जाणर आहे. आता सुपर-8 चे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. या ठिकाणी स्पिनर्सच्या अनुषंगाने चांगली पीच असल्याचं म्हणलं जातंय. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात स्पिन गोलंदाजी मजबूत करण्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचा समावेश करू शकतो. यावेळी मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीपचा समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला कमी लेखू नये, असे हरभजन म्हणाला. तो पुढे म्हणाला, “या संघात ताकद आहे आणि ते कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करू शकतात. त्यामुळे जेव्हा ते भारताविरुद्ध खेळतात तेव्हा त्यांना कमी लेखले जाऊ नये. कारण त्यांनी नाणेफेक जिंकली आणि काही गोष्टी त्यांच्या बाजूने गेल्या तर ते भारतासाठी आव्हानात्मक ठरु शकते.” अफगाणिस्तान संघ मोठे उलटफेर करण्यात पटाईत आहेत. कारण त्यांनी याच्याआधी असे पराक्रम केले आहेत. टी-२० विश्वचषकात धावांचा फार मोठा टप्पा अद्याप गाठता आलेला नाही. आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए विरुद्धच्या अलीकडील सामन्यांमध्ये कोहलीने अनुक्रमे केवळ एक, चार आणि शून्य धावा केल्या आहेत. त्यामुळेच भारतीय संघाच्या लाईनअप मध्ये थोडा बदल करावा आणि कोहलीला तिसऱ्या स्थानी पाठवावं अशी मागणी होत आहे. संभाव्य प्लेईंग ११ रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.