IMG-LOGO
महाराष्ट्र

मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित : देवेंद्र फडणवीस

Saturday, Sep 07
IMG

टीव्ही ९ मराठी कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुंबई, दि. ७ :  संजय राऊत यांना जळी-स्थळी मीच दिसत असेन तर ठीक आहे. दिवसरात्र ते माझ्यावरच बोलतात. महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस काय आहेत ते माहीत आहेत. विरोधकांना वाटतं की माझी इमेज डॅमेज करुन त्यांना वाटत असेल काही जागा काढू शकतील तर ते शक्य होणार नाही. मला कितीही दुषणं दिली, कितीही शिव्या दिल्या तरीही माझ्या नावावर लागलेली जी कामं आहेत, जे व्हिजन महाराष्ट्राला दिलं आहे त्यात माझ्याशी ते बरोबरीच करु शकत नाहीत. वर्षानुवर्षे तुम्ही राज्य चालवलं सांगा तुम्ही काय केलं? त्यांना उत्तरच देता येत नाही. मग मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जाता. देवेंद्रवर रोज आरोप करा, रात्रंदिवस आरोप करा हे चालतं. माझ्याशी इतर कुठल्याही मुद्द्यावर स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की ते मला किती मोठा नेता मानतात ते स्पष्ट होतं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला ही आनंदाची गोष्ट वाटते, यातून राजकारणातलं स्थान लक्षात येतं. तुम्हाला फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो, शरद पवारही तेच करतात, काँग्रेसही तेच करते. मनोज जरांगे तर आहेतच. पण एकच गोष्ट सांगतो यांना वाटतंय हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहेत. मात्र त्यांना एकच सांगणार आहे की तुम्ही (विरोधक) चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे. काहीही झालं तरीही माझा अभिमन्यू होणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठी कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Share: