IMG-LOGO
महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मी ज्योतिषी नाही पण महाविकास आघाडीला बहुमत मिळेल : शरद पवार

Wednesday, Nov 20
IMG

शरद पवार यांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बारामती, दि. २०  : राज्यात आज सकाळी विधानसभा मतदार संघासाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले आहे. बारामती येथे अजित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. तर शरद पवार यांनी  येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी मतदान केल्यावर राज्यात सत्ताबदल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. पण राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे चित्र दिसत आहे. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे. शरद पवार यांनी अजित पवारांचा महायुतीला बहुमत मिळण्याचा दावा खोडून काढला आहे.

Share: