IMG-LOGO
क्रीडा

INDvsUSA : ७ विकेट्सने टीम इंडियाने अमेरिकेचा केला पराभव

Thursday, Jun 13
IMG

विजयासह अ गटात टीम इंडियाने 6 पॉईंट्सह अव्वल क्रमांकावर आहे.

न्यूयॉर्क, दि. १३ : भारत विरूद्ध अमेरिका यांच्यामध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव केला. टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय होता. या विजयासह अ गटात टीम इंडियाने 6 पॉईंट्सह अव्वल क्रमांकावर आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदावर टी-२० विश्वचषक २०२४ खेळवला जात आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सामन्यात अमेरिकेने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना १११ धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३ विकेट्स गमावून सामना जिंकला.भारतीय संघाने ३९ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या तुफानी खेळने अमेरिकेचा पराभव केला. सूर्याने टी-२० विश्वचषकातील चौथे अर्धशतकही झळकावले. या सामन्यात सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ५० तर दुबेने ३५ चेंडूत नाबाद ३१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. सूर्या आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी ६५ चेंडूत ६७ धावांची नाबाद भागीदारी केली. याशिवाय ऋषभ पंतने १८ आणि रोहित शर्माने ३ धावा केल्या. विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकरने २ आणि अली खानने १ विकेट घेतली. अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली, त्याचं श्रेय आम्हाला जातं. सूर्या आणि दुबे यांनी शानदार खेळ दाखवत टीमला विजयापर्यंत नेलं. यै ठिकाणी क्रिकेट खेळणं सोप नव्हतं. आम्हाला खेळाच्या अंतापर्यंत टिकून राहणं गरजेचं होतं. या विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे.

Share: