IMG-LOGO
क्रीडा

T-20 WC 2024 : भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा ६ धावांनी विजय

Monday, Jun 10
IMG

पावसाने व्यत्यय आणूनही भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठी पर्वणी ठरली.

न्यूयॉर्क, दि. १० :  आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानवरच्या वर्चस्वाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. २०२१ साली दुबईत खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपचा अपवाद वगळता आतापर्यंत आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमालीचा मारा करत पाकिस्तानवर ६ धावांनी मात केली. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावांचं माफक आव्हान मिळालं होतं. परंतु न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर धावा काढणं पाकिस्तानला जमलं नाही.भारतीय गोलंदाजांच्या अखेरच्या षटकांतील भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील फलंदाजीसाठी अवघड असलेल्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर तगडी फलंदाजी फळी असलेला भारतीय संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला. बुमराहच्या १५व्या षटकापासून गोलंदाजांनी पाकिस्तानला एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. तर बुमराहने १९व्या षटकात इफ्तिखार अहमदची विकेट घेत पाकिस्तान संघावर मोठा दवाब टाकला. तर अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनेही विकेट घेतली. पावसाने व्यत्यय आणूनही भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठी पर्वणी ठरली.

Share: