IMG-LOGO
नाशिक शहर

Insta Reel साठी रेल्वेच्या मोटारमनच्या केबिनमध्ये घुसले; दोघांना अटक

Saturday, Aug 10
IMG

हा व्हिडिओ व्हायरल होऊन रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला.

नाशिक, दि. १० : सध्या सोशल मीडियावर विविध ट्रेंड व्हायरल होत आहे. हे ट्रेंड फॉलो करत रील्स तयार करणाचे वेड तरुणांना लागले आहे. आता दोन तरुणांनी रील्स तयार करण्यासाठी दोन तरुण रेल्वेच्या मोटारमनच्या केबिनमध्ये घुसल्याचा प्रकार पुढे आला आहे. रेल्वे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजा हिम्मत येरवाल (२०) आणि रितेश हिरालाल जाधव (१८ दोघे रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे २५ जुलै रोजी कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म ४ वर उभ्या असलेल्या उपनगरीय रेल्वे ९५४१० च्या मोटरमनच्या केबिनमध्ये घुसले. एकाने अॅक्टिंग केली तर दुसऱ्याने त्याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड देखील केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होऊन रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. यामुळे संबंधित तरुणांवर कारवाईचे आदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते. त्यांची चौकशी केली असता आरोपीने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Share: