IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

Maharashtra Vidhansabha Election 2024 : फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही : जरांगे-पाटील

Tuesday, Oct 15
IMG

देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मुंबई, दि. १५ : देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता. मात्र, आता त्यांना मत द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य उध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा मराठा समाजातील गोरगरीब जनतेला होती. मात्र, आता ती अपेक्षा फोल ठरली”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

Share: