गेट वे ऑफ इंडियासमोर आंदोलकांची घोषणाबाजी सुरु झाली आहे.
मुंबई, दि. १ : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीने मोर्चाची हाक दिली असून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज महाविकास आघाडीने आज (रविवार, १ सप्टेंबर) जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंसह मविआचे अनेक नेते येथे उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडियासमोर आंदोलकांची घोषणाबाजी सुरु झाली आहे. शिवद्रोही सरकारविरोधात आम्ही जोडे मारो आंदोलन करणार आहे. आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणं हा भाजपचा मूर्खपणा असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आंदोलनादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीका केली. आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० पासून बंद ठेवण्यात आला आहे. या आंदोलनाला हुतात्मा चौकातून सुरुवात होणार आहे. येथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे.