भगवंतासमोर बसलो आणि देवालाच सांगितले अयोध्या प्रकणावर आता तुम्हीच मार्ग शोधून द्या, अशी विनंती केली.
पुणे, दि. २१ : ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली. शेकडो वर्षांपासून रखडलेल्या अयोध्या प्रकरणावर आम्हालाही मार्ग सापडत नव्हता.पण देवावर आस्था असली की मार्ग मिळतो. आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. यावर मार्ग कसा शोधयचा? हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. पण मी माझ्या दैनंदिन देवाची पूजा करतो. मी भगवंतासमोर बसलो आणि देवालाच सांगितले अयोध्या प्रकणावर आता तुम्हीच मार्ग शोधून द्या, अशी विनंती केली. आपली अस्था असेल, देवच मार्ग शोधून देतात’, असे चंद्रचूड म्हणतात. पुणे येथील खेड तालुक्यातील कान्हेरसर या मूळ गावी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी असेही वक्तव्य केले आहे.