IMG-LOGO
नाशिक शहर

केशव किसन महाराज काजळे यांना आंतरराष्ट्रीय कौन्सिलर सेवा आरोग्य प्रवचनाकार समाज रत्न पुरस्कार यांना जाहीर; उद्या वितरण

Friday, Aug 30
IMG

कॅन्सर रिसर्च सेंटर घ्या इथिक्स कमिटीने मेंबर म्हणूनही अनेक पेशंटला मदत करतात.

नाशिक, दि. ३० : अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आणि महाराष्ट्र सांस्कृतिक विद्युत ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयकॉन ऍम्बेसेडर  पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. ३१) सकाळी १०:३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणार आहे. केशव किसन महाराज काजळे यांना आंतरराष्ट्रीय कौन्सिलर सेवा आरोग्य प्रवचनाकार समाज रत्न पुरस्कार प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय व राज्याध्यक्ष अजित हुकुमचंद बागमार यांनी दिली आहे. हभप केशव किसन महाराज काजळे यांचा परिचय असा शिक्षण :  एम.ए.,बि.एड्., एमसीजे-मास कम्युनिकेशन ऍन्ड जर्निलिझम,योग, निसर्गोपचार आणि एक्युप्रेशर,काउंसेलर , यांना आरोग्य विमा क्षेत्रात लंडन, रोम इटली, ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड फ्रान्स दुबई सिंगापूर थायलंड -बॅंकॉक व भारतातही अनेक ठिकाणी गोल्ड मेडलिस्ट म्हणून उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले आहे . विविध हॉस्पिटल मध्ये मेडिक्लेम असो नसो ग्रामीण व शहरी भागातील लोकांना ते कायम किफायतशीर वाजवी दरात सेवा उपलब्ध करून देण्यात बहुमोल योगदान आहे.कॅन्सर रिसर्च सेंटर घ्या इथिक्स कमिटीने मेंबर म्हणूनही अनेक पेशंटला मदत करतात. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे सादर करण्यासाठी देखिल सतत कार्यरत आहे.सोबत वडिलांची कीर्तन प्रवचन परंपरा पण जपत आहे.या सर्व कार्यात पत्नी उर्मिला मॅडम यांचाही सिंहांचा वाटा असुन त्याही एम ए -संगीत व मराठी, एम एड, संगीत विशारद आहेत.

Share: