चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
कोलकाता, दि. २२ : येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह अजून काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या चौकशीमधून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आता माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.