IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

लोकशाहीचा उत्सव : मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी बजावला मतदानाचा हक्क

Friday, Apr 19
IMG

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघांतील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.

नागपूर, दि. १९ : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशभरातील १०२ आणि महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघांतील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. या वेळी राजकीय नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ---प्रफुल्ल पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या बरोबर पत्नी आणि तिन मुलं होती. त्यांनीही मतदान केले. मतदानानंतर पटेल यांनी देशात मोदींची हवा असल्याचे सांगितले. ---कोराडी येथे ग्रामपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. ---चंद्रपुरात काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. वंचितचे उमेदवार राजेश बेले यांनी ही मतदान केलं. समाजसेवक विकास आमटे यांनी ही आनंदवनात मतदान केलं.---रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी उमरेड इथे मतदानाचा हक्क बजावला. ---नितीन गडकरी यांनी केले मतदानजगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा भव्य उत्सव. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान  होत आहे. नागपूरच्या प्रगतीसाठी मी नागपूरच्या जनतेला 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन करतो. देशासाठी आपले मत महत्वाचे आहे! असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ---नागपूर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर आपण एक लाखाच्या मतांनी विजयी होवू. मी जायंट किलर ठरणार आहे असा दावा केला आहे. ---राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी सर्वांना मतदान करावे असं आवाहन केलं. मतदान हा आपला हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   ---काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला---नागपूर विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.---उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मतदान देवेंद्र फडणवीस यांचं पत्नी अमृता फडणवीस आणि आईसह मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीचा महोत्सव सुरु आहे, मी माझ्या पत्नी आणि आईसह मतदान केलं, जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस यांवेळी म्हणाले---विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलनवाडी वॉर्ड, ब्रह्मपुरी येथे सहकुटुंब मतदान केले---नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी. पी. अँड बेरार शाळेत स्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला---माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्नीक आपले मुळ गाव वडविहीरा तालुका नरखेड येथे मतदानाचा हक्क बजावला.

Share: