धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
मुंबई, दि. ११ : काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून कल्याण काळे यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.कल्याण आणि जालन्यातील उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील उत्तर मुंबई, मुंबई उत्तर मध्य आणि माढा या ठिकाणचे उमेदवार जाहीर होणं बाकी आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शोभा बच्छाव या नाशिकच्या माजी महापौर आहेत. तसेच त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे.कल्याण काळे हे माजी आमदार असून २००९ साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ ८ हजार मतांनी पराभव झाला होता. नंतर २०१४ आणि २०१९ सालीही रावसाहेब दानवे जालन्यातून निवडून आले.